आमदार रोहित पवारांचा फोटो पाहून तुम्हालाही वाटेल आमदार असावा तर असा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- रोहित पवार यांना आपली गाडी थांबवून अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला धावले गेल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

रोहित पवार यांनी स्वत: काट्यात गेलेली अपगातग्रस्त गाडी बाहेर काढण्यासाठी मदत केली. रोहित पवार यांचं हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

मांडवे- पिंगळी (ता.माण) यादरम्यान बुधवारी दहिवडीतील काटकर या शेतकऱ्याचा अपघात झाला होता. दामोदर काटकर यांची व्हॅन अपघातानंतर रस्त्याच्या खाली काट्यामध्ये गेली होती.

हा प्रकार आमदार रोहित पवार यांनी पाहताच गाडी थांबवत अपघातस्थळी धाव घेत, काटकर यांची चौकशी करत आधार दिला. घटनेचं गांभीर्य ओळखत रोहित पवार यांनी सहकाऱ्याच्या साह्यानं तात्कळ मदत केली.

या अपघातामध्ये शेतकरी काटकर जखमी झाले आहेत. रोहित पवार यांनी तात्काळ त्यांची रुग्णालयात जाण्याची सोय केली. रोहित पवार यांनी शेतकऱ्याची व्हॅन उपस्थितांच्या मदतीने आमदार पवार यांनी ढकलत रस्त्यावर आणली.

रोहित पवार यांच्या या सामाजिक बांधिलकीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून त्यांच्या या मदतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

दरम्यान याबाबत रोहित पवार म्हणाले की, पोलीस चौकशीला घाबरुन अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळं वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो.

त्यामुळं माझं आवाहन आहे, कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत करा आणि पोलिसांनाही विनंती आहे, अशा लोकांना चौकशीसाठी त्रास देऊ नये.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24