अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- दरवर्षी कापसाचा श्री गणेशा हा दसऱ्याला व्यापाऱ्यांकडून केला जातो मात्र यावर्षी पाऊस वेळेवर पडल्यामुळे पेरणी लवकर झाली त्यामुळे दसऱ्याच्या अगोदरच शेतकऱ्यांनी कापूस काढून विकायला सुरुवात केली.

कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट न बघता थेट व्यापाऱ्यांना कापूस हा कवडीमोल भावात विकावा लागत आहे. सीसीआय केंद्र लवकर सुरु न झाल्यास त्याचा लाभ व्यापारी घेण्याची शक्यता असून यंदाही कमी भावात खरेदीचे दृष्टचक्र थांबण्याची चिन्हे नाहीत.

केंद्र सरकारने यावर्षी कापसाला हमीभाव ५ हजार ८२५ रुपये जाहीर केला आहे. शेतकऱ्याचा कापूस निघण्यास सुरूवात झाली असून

शासनाचा हमीभाव मात्र कागदावरच असून शेतकऱ्यांना आपला कापूस ४००० ते ४२०० रुपये भावाने कवडीमोल विकावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी सिसिआयने शेतकऱ्यांचा नाकारलेला कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केला होता. केंद्रीय कापूस मंडळ किंवा फेडरेशन १२ टक्क्यांपेक्षा कमी आद्रतेचाच कापूस खरेदी करते.

आर्द्रता अधिक असल्यास कापूस नाकारला जातो. हाच कापूस मग ४००० ते ४२०० रुपये क्विंटलच्या आसपास व्यापारी खरेदी करतात. व तोच कापूस सिसिआय कशी काय खरेदी करते असा सवाल काही शेतकऱ्यांनी केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24