अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘लोकसभेच्या 2009च्या निवडणुकीत राज्यात सर्वांत सुरक्षित, तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी व रिपब्लिकन पक्षाची सर्वाधिक मते असणारा शिर्डी मतदारसंघ होता. मला शिर्डीतून उमेदवारी मिळाली;
परंतु बाळासाहेब विखे पाटील यांना दक्षिणेतून उमेदवारी मिळाली नाही. परिणामी, विजय वाकचौरे यांच्या शिर्डीत मला पराभवाला सामोरे जावे लागले,’ असे रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.
शिर्डी लोकसभेचे २००९ मध्ये तिकीट मिळाले, तेव्हा राधाकृष्ण विखे यांना त्यांच्यासाठी नगर दक्षिणेची जागा हवी होती. त्यांनी प्रचंड प्रयत्न केले; पण त्यांना अपयश आले. जोवर तिकिटाचा प्रश्न सुरू होता. तोवर त्यांनी मला सपोर्ट केला.
नंतर तिकीट नाकारले, तेव्हा त्यांनी माझ्या पाठिंब्याचा हात काढून घेतला. त्यामुळेच माझा पराभव झाला,’ असा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला.
अकोले येथे ‘रिपाईं’चे राज्यसचिव विजय वाकचौरे यांच्या घरी घेण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. आठवले त्यांच्या मिश्किल शैलीत म्हणाले, ‘विजय यांचे नाव विजय असले, तरी मला शिर्डीत पराभव स्विकारावा लागला.
मला वाटत होते, शिर्डीत मागासवर्गीय लोक जास्त आहेत. त्यामुळे किमान ७ ते ८ लाख मते मला पडतील; पण माझा पराभव झाला. त्याला दुसरे तिसरे कोणी जबाबदार नसून, काँग्रेसच जबाबदार आहे.