महाराष्ट्र

मदरशांत राष्ट्रगीत तर मग संघाच्या शाखेतही…. काँग्रेसची मागणी

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Politics :- उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने तेथील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे केले आहे. या निर्णयाचे देशभर पडसाद उमटत आहे. ठिकठिकाणी या निर्णयाचे स्वागतही होत आहे.

मात्र महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी यावरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. योगी सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत यांनी म्हटले आहे, ‘तर मग आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक शाखेत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन अनिवार्य करण्यात यावे.

तसेच संघाच्या प्रार्थनेवर बंदी आणून राष्ट्रगीतच अनिवार्य करण्यात यावे.’ उत्तर प्रदेशात सरकारने राज्यातील १६ हजार मदरशांमध्ये राष्ट्रगीत गायन सक्तीचं केले आहे. एप्रिलमध्ये रमझानचा महिना असल्याने मदरसे बंद होते. त्यामुळे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती. ती आता करण्यात येणार आहे.

Ahmednagarlive24 Office