महाराष्ट्र राज्य शासनाने कांदा पीकाच्या नासाडीवर नियंत्रण रहावे म्हणून अणुउर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. या कांदा महाबॅंक प्रकल्पाचा प्रारंभ नगर जिल्ह्यातील राहुरी येथील हिंदुस्थान अॅग्रो कंपनीच्या अणुउर्जा
प्रकल्पात पहिली कांदा महाबँक सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितील घेण्यात आल्याने राहुरी परिसराला मोठा लाभ होणार आहे. कांद्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू होत आहे.
राज्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बँक सुरू करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले. कांद्याचे उत्पादन ज्या भागात जास्त जिल्ह्यांत होते, अशा नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे विकरण प्रक्रिया केंद्र उभारून कांद्याची महाबँक तातडीने सुरू करण्यात यावी.
यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पणन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जागांचा वापर करण्यात यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य शासनाने अन्न, भाजीपाला, कांदा पीकावर प्रक्रिया करता येत नसल्याने सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांचा माल खराब होतो.
परिणामी शेतकऱ्यांकडून नासाडी होण्याऐवजी मिळेल ती रकम पदरात घेत शेती माल विक्री करावे लागते. त्यात कांद्याचा समावेश असून नासाडीमुळेच कांदा उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान होते. त्यामुळे कांदा नासाडी रोखण्यासाठी अणुउर्जावर आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला.
राहुरी येथून सुरुवात
कांदा हे नाशवंत पीक आहे. अणुऊर्जेच्या माध्यमातून त्यावर प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येईल. या कांदा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कांद्याची महाबँक ही संकल्पना प्रत्यक्षात येत असून,
त्याची सुरुवात नगर जिल्ह्यातील राहुरी येथून होत आहे. या ठिकाणी हिंदुस्थान अॅग्रो संस्थेच्या माध्यमातून कांद्याची बँक सुरू होत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.