बिहारच्या प्रचारात महाराष्ट्राची फौज; काँग्रेसकडून ‘ह्यांना’ जबाबदारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  सध्या बिहारमध्ये प्रचाराची धूम आहे. प्रत्येक पक्ष आपले बलाबल यात दाखवत आहे. काँग्रेसपक्षानेही आपली राजकीय फासे आवळायला सुरुवात केली आहे.

त्यासाठी बिहारमधील 38 जिल्ह्यांसाठी देशभरातून विविध राज्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

त्यांना 20 ऑक्टोबर रोजी बिहारमध्ये दाखल होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.बिहार निवडणुकीसाठी भाजपकडून सर्वांत प्रथम महाराष्ट्राचा सहभाग देण्यात आला.

विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तेथे पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण,

मुंबई पोलिस यासह महाराष्ट्रातील इतर विषय बिहारच्या निवडणुकीत चर्चेत आले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने तेथे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातून त्यांचे स्टार प्रचारक आणिपदाधिकारी तेथे जाणार आहेत.

आता काँग्रेसनेही महाराष्ट्रातून पदाधिकारी बिहारला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.बिहार निवडणुकीच्या प्रचारात यावेळी प्रथमच महाराष्ट्राला महत्व प्राप्त झाले आहे.

त्यामुळे सर्वच पक्षांनी आपली फौज तिकडे पाठविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे तेथील प्रचारात महाराष्ट्रासंबंधीचे मुद्दे उपस्थित झाल्यास त्यावर वाद-प्रतिवाद होणार आहे.

महाराष्ट्रातून कुणाची निवड ? :- काँग्रेसच्या निवडणूक निरीक्षकांमध्ये महाराष्ट्रातील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख (नगर), नामदेव उसेंडी (गडचिरोली), राजाराम पानगव्हाणे (नाशिक),

सुनील शिंदे (पुणे) यांचीही बिहारमधील विविध जिल्ह्यांत निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व बिहार निवडणुकीचे प्रचार प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24