अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम चोरट्यांनी फोडले. त्यातील १९ लाख ९३ हजार २०० रुपयांची रोकड लांबवण्यात आली.
हे पण वाचा :- फोटो वायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार
ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. बाभळेश्वर येथे लोणी-संगमनेर रस्त्यालगत घोगरे पेट्रोलपंपासमोर बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आणि एटीएम आहे.
हे पण वाचा :- बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्याची ही जबाबदारी नाकारली !
मध्यरात्री चोरट्यांनी एटीएम दरवाजा, तसेच इतर साहित्याची तोडफोड करत आत प्रवेश केला. संपूर्ण एटीएम चोरांनी बाहेर काढले. ते जड असल्यामुळे गाडीद्वारे ओढत रस्त्याच्या पलीकडे नेण्यात आले.
हे पण वाचा :- महिलेचा पाठलाग करत थेट तिच्या फ्लॅटवर जाऊन बलात्कार !
आवाजाने परिसरातील काही नागरिक जागे झाले. त्यामुळे एटीएम गाडीला बांधून चोरट्यांनी लोणीच्या दिशेने धूम ठोकली. एटीएमचे बरेच पार्ट रस्त्याच्या कडेला पडलेले आढळले.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग ; पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या त्रासातून तरुणाचा गळफास
बाभळेश्वर येथील काही तरुणांनी गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु भरधाव वेगाने ती निघून गेली. येथील एटीएम फोडण्याची ही दुसरी घटना आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्यामुळे फुटेज दिसत नाही.
हे पण वाचा :- श्रीगोंद्यात चाकूने भोसकून वृध्दाचा खून
महाराष्ट्र बँक खासगी कंपनीद्वारे एटीएम चालवते. सुरक्षा रामभरोसे आहे. रात्री सिक्युरिटी गार्ड किंवा वॉचमन नसतो. याबाबत लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.