अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज देण्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे.
तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
कृषी बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या योजनेची घोषणा यावेळी अजित पवार यांनी केली. दरम्यान, कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी 1500 कोटी रुपयांचा महावितरणला निधी दिला जाणार.
तसेच ‘विकेल ते पिकेल’ योजनेला 2100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. कोरोना काळात उद्योग सेवा क्षेत्रात घट झाली आहे.
मात्र, कृषी क्षेत्रात 11 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हावी म्हणून सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, असे ते म्हणाले.
विकेल ते पिकेल योजनेसाठी 2100 कोटी किमतीचा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय प्रकल्प राबवला जातोय.विदर्भातील अमतरावतीमध्ये संत्रा संशोधन केंद्र प्रत्येक तालुक्यात अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना सुरु करण्यात येईल.
चार कृषी विद्यापीठांना दरवर्षी 200 कोटी प्रमाणं तीन वर्षे 600 कोटी रुपये देण्यात येणार आहे.
मत्सव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी नाबार्डकडून अर्थसहाय्यकुक्कुटपालन व्यवसायासाठी पुणे येथे संशोधन केंद्र कृषी आणि इतर क्षेत्रासाठी 3274 कोटी निधी प्रस्तावित.