मुंबई :- शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्रृत्वात सरकार स्थापन करण्याची तयारी केली असून महाशिवआघाडीमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय.
जाणून घेऊयात या फॉर्म्युल्यानुसार कोणत्या पक्षाला कोणतं पद मिळणार? आणि खातेवाटप कसं असणार?
मिळालेल्या माहितीनुसार, महाशिवआघाडीतील सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्याचा प्रस्ताव जवळपास निश्चित झाला असून त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल.
या फॉर्म्युल्यानुसार, शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादीला पाच वर्षे उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे.
राज्यात पाहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्रिपद असणार असल्याचं बोललं जात आहे. कॉंग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचा एक असे दोन उपमुख्यमंत्री राज्याला मिळू शकतात.
यासोबतच शिवसेनेला एकूण १५ मंत्रिपदं, राष्ट्रवादी काँग्रेसला १४ मंत्रिपदं आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदं देण्याचाही असल्याचाही प्रस्ताव आहे.