Maharashtra Havaman Andaj : पावसाचा जोर कायम! महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे तर अनके नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रातील पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच मुंबई, ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनके सखल भागात पाणी साचल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.

तसेच काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची खरीप पिके नष्ट झाली आहेत तर काही भागात शेतातील मातीही वाहून गेली आहे.

राज्यातील अनके भागात आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याकडून आजही राज्यातील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागाने राज्यातील या भागांमध्ये दिला मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याकडून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यातील घाट माथा परिसरात सध्या जरी पावसाचा जोर कमी झाला असाल तरी येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

तसेच कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी देखील हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोल्हापूर, सिंधुदुर्ग, विदर्भातील बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ,वाशीम या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकंना हवामानाचा अंदाज घेऊन बाहेर पडण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मुंबई आणि ठाणे विभागासह उपनगरात मुसळधार पाऊस सुरूच

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. तसेच आजही या भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.