Maharashtra IMD Alert : नागरिकांनो लक्ष द्या, अहमदनगर, पुणेसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra IMD Alert: राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास उशीर होत असल्याने बहुतेक जिल्ह्यात हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. यामुळे काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस तर काही  जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे.

तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने येत्या आठवड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला आहे.

येत्या 24 तासांत मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये संध्याकाळी किंवा रात्री हलका पाऊस पडण्याची शक्यता असून आकाश ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात कमाल आणि किमान तापमान 34 ते 28 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर ठाणे आणि पालघरमध्येही वादळी पावसाची शक्यता आहे.

तर धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, वाशीम, यवतमाळ, वर्धा, अमरावती जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. या दरम्यान, वारा 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची अपेक्षा आहे तर हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

तर आज धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद येथे विविध ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, विदर्भात 6 ते 8 जून दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातील अनेक भागात पुढील 24 तासांत ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार विदर्भातील अमरावती, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :-  Lucky Zodiac Signs: काय सांगता! ‘या’ तीन राशींवर नेहमीच असतो लक्ष्मीचा आशीर्वाद, भासत नाही पैशाची कमतरता