महाराष्ट्र

महाराष्ट्रात येत्या हंगामात साखर उत्पादन 122.5 लाख टन होण्याची शक्यता

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) जून 2021 च्या अखेरच्या आठवड्यात करण्यात आलेल्या सॅटेलाईट मॅपिंगच्या पहिल्या सर्वेक्षणाच्या आधारावर 2021-22 या हंगामासाठी 310 लाख टन साखर उत्पादनाचे प्रारंभिक अनुमान जारी केले होते.

इस्माने 2021-22 या हंगामात 305 लाख टन साखर उत्पादनाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इस्माने सांगितले की, देशभरात ऊसाच्या पिकाच्या लागवडीची उपग्रहाद्वारे दुसरी छायाचित्रे ऑक्टोबर 2021 च्या दुसर्‍या आठवड्यात घेण्यात आली आहेत.

यामध्ये महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र 11.48 लाख हेक्टर टनावरून वाढून 2021-22 मध्ये 12.78 लाख हेक्टर झाले आहे. महाराष्ट्रात 2021-22 या हंगामात साखर उत्पादन 122.5 लाख टन होण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटकात 2021-22 या हंगामात साखर उत्पादन 49.5 लाख टन होण्याची अपेक्षा आहे.

उर्वरीत राज्यांत 2021-22 या हंगामात सामूहिक रुपाने 53.10 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील उसाचे क्षेत्रफळ 23.08 लाख हेक्टर असेल असा अंदाज आहे. उत्पादीत साखर उत्पादन, 2021-22 मध्ये इथेनॉल उत्पादनावर आधारित 113.5 लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे.

उपग्रहांच्या छायाचित्रांच्या आधारावर 2021-22 या हंगामात उसाच्या एकूण लागवड क्षेत्र 54.37 लाख हेक्टर असण्याची शक्यता आहे. 2020-21 या हंगामातील 52.88 लाख हेक्टर ऊस क्षेत्राच्या तुलनेत ते 3 टक्क्यांनी अधिक आहे. 28 ऑक्टोबर 2021 रोजी इस्माच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली.

Ahmednagarlive24 Office