अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- कोरोना व्हायरसनं देशात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपतोय.
दरम्यान केंद्र सरकारकडून मिळालेल्या संकेतानुसार १८ मेपासून ‘लॉकडाऊन ४’ ची सुरुवात होणार असून हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत चालणार आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्र सरकारनं 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. आता लॉकडाऊन 4.0 ला सुरवात होणार आहे.
31 मेच्या मध्यरात्रीपर्यंत संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू असणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.नुकतंच याबबतची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता पुढील 14 दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 30 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात काल 1 हजार 606 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 706 वर पोहोचली आहे.
नागरिकांना स्वत:चे आरोग्य आणि सुरक्षेची काळजी स्वत: घ्यावी लागेल.
केंद्राकडून राज्यांना अनेक गोष्टीत निर्णय घेण्याची मुभा दिली जाईल.
ग्रीन झोनमध्ये प्रवास आणि उद्योगांसाठी परवानगी मिळू शकते.
ग्रीन झोनमध्ये बस आणि टॅक्सीसाठी परवानगी मिळू शकते.
प्रवासी ट्रेनला सध्या परवानगी नाही.
स्पेशल ट्रेन आणि श्रमिक ट्रेन पहिल्याप्रमाणे सुरु राहील
१८ मेपासून ठराविक ठिकाणी विमान सेवा सुरु होण्यावर विचार केला जाईल.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com