अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- संपूर्ण राज्यात तूर्तास लॉकडाऊन लागू होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यानुसार आज रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
आजपासूनच (27 मार्च मध्यरात्रीपासून) हे कडक निर्बंध लागू होणार आहेत. रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडू नये असं सांगण्यात आलं आहे. पाच जणांपेक्षा अधिक माणसांनी एकत्र बाहेर पडण्यावर बंदी आहे.
मास्क न लावल्यास, रस्त्यावर थुंकल्यास, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्यास तातडीने दंड करण्यात येईल. या कुठल्याही नियमाचं पालन न करणाऱ्यांना जागच्या जागी दंड करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
Mission Begin Again :- रात्रीची जमावबंदीचे आदेश, पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी, रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत जमावबंदी, 27 मार्चपासून जमावबंदी लागू, 15 एप्रिलपर्यंत निर्बंध राहणार !
- फेस कव्हरिंग्ज – सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी फेस कव्हर घालणे अनिवार्य आहे.नियमाचं उल्लंघन झालं तर 500 रुपये दंड
- सामाजिक अंतर – Social distancing च्या नियमानुसार किमान 6 फुटांचं अंतर एकमेकांमध्ये ठेवणं बंधनकारक आहे.
- दुकानं, रेस्टॉरंट, मॉल आदी ठिकाणी ग्राहकांमधील सोशल डिस्टन्सिंग दिसलं नाही तर कडक कारवाई. एका वेळीपाचपेक्षा जास्त लोकांना परवानगी देणार नाहीत.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू, सीटीसी वापरण्यास मनाई आहे.
- Work from Home – शक्य असेल तेथे घरूनच काम करण्याचे आदेश. बाजारपेठा, खासगी आणि सरकारी ऑफिस इथे पूर्ण संख्येने कर्मचारी नसतील.
- कामाच्या ठिकाणी, बाजारपेठांमध्येही किमान 6 फुटांचं अंतर दोन व्यक्तींमध्ये असलंच पाहिजे. त्यासाठी शिफ्टमध्ये काम करावं. कर्मचार्यांचे लंच ब्रेक अगदी लिफ्टमधल्या गर्दीवरही नियंत्रण ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
- Covid Home isolation – एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आणि त्याला घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला मिळाला, तर अशा घरावर, सोसायटीवर किमान 14 दिवस कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती घरात आहे, अशी पाटी लावण्यात यावी.