सरकारला माफी मागावीच लागेल: ॲड. ढाकणे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील व त्यांच्या समर्थनार्थ आलेल्या मराठा समाजातील शेकडो समर्थकांवर झालेल्या अमानुष लाठीमार व गोळीबाराचा आज तालुक्यातील आल्हणवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रतापराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला.

या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बोलताना प्रतापराव ढाकणे म्हणाले, राज्य सरकार कोणत्याही समाजाच्या भावना निटपणे समजून घेण्यास तयार नाही. जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या रखडलेल्या आरक्षणाबाबतीत तेथील मनोज जरांगे पाटील हे आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत रास्त मागणीसाठी शांततेच्या मार्गाने उपोषणास बसले होते.

त्यांच्या या आंदोलनाला परिसरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सरकारला खुपत होते. काल दुपार नंतर आचानक जिल्हा प्रशासनाने मोठा पोलीस फौजफाटा तैनात करत बळाच्या जोरावर हे अंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला, त्यात शेकडो मराठा आरक्षण समर्थक गंभीररीत्या जखमी झाले.

पोलिसांनी महिला व वृध्द नागरिकांनाही मारहाण केली, एवढेच नव्हे तर गावातील मंदिरातील भजनी मंडळ व हरिपाठ करणाऱ्या वारकऱ्यांवरही हल्ला करत त्यांनाही जखमी केले, हा प्रकार अतिशय निंदणीय आहे. राज्यात भाजपाच्या माध्यमातून सत्तारुढ झालेले सरकार कुठल्याही समाजाच्या भावना व वेदना समजून घ्यायला तयार नाही,

असे ढाकणे म्हणाले. याप्रसंगी गहिनीनाथ दादा शिरसाट, उद्धव दुसंग, रामराव चव्हाण, सुरेश पवार, रामदास कर्डिले, रामेश्वर कर्डिले, भाऊ कर्डिले, उत्तम पवार, किशोर झांबरे, राजू कर्डिले, धनंजय कर्डिले, आण्णा फुंदे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.