‘या’ तारखेला ज्या बालकांचे 6 वर्ष वय पूर्ण होणार त्यांनाच यंदा पहिलीत प्रवेश !

Tejas B Shelar
Published:
Maharashtra News

Maharashtra News : तुम्हीही तुमच्या घरातील बालकाला पहिलीच्या वर्गात दाखल करणार आहात का ? हो, तर मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरे तर, केंद्र शासनाने कमी वयात बालकांवर शिक्षणाचा ताण येऊ नये यासाठी नर्सरी पासून ते पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी काही नियम तयार केले आहेत.

या नियमानुसार आता 3 वर्षांच्या बालकाला नर्सरीत प्रवेश दिला जाणार आहे आणि सहा वर्षांच्या बालकाला पहिलीत प्रवेश मिळणार आहे.

दरम्यान, कमी वयात बालकांवर अभ्यासाचा अधिक ताण पडू नये, यासाठी केंद्र सरकारने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षे कधीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे हे नुकतेच निश्चित केले आहे.

यानुसार ज्या बालकांचे वय 31 डिसेंबर 2024 ला सहा वर्षांचे पूर्ण होतील त्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली मध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो. यापेक्षा कमी वयाच्या बालकांना मात्र इयत्ता पहिली मध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

म्हणजे यंदा पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय 31 डिसेंबर 2024 ला सहा वर्षे पूर्ण झालेले असणे आवश्यक असेल.

म्हणजेच आता खाजगी असो की शासकीय कोणतीही शाळा असली तरी देखील त्या शाळेला विद्यार्थी सहा वर्षाचे पूर्ण झाल्यानंतरच त्यांना पहिली मध्ये प्रवेश देता येणार आहे.

दरम्यान, 31 डिसेंबर 2024 ला सहा वर्षे पूर्ण होणाऱ्या अशा बालकांना सक्ती पात्र तथा दाखल पात्र म्हणून समजण्यात येणार आहे. ‘आरटीई’नुसार अशा बालकांना शाळेत दाखल करून घेण्याची जबाबदारी ही संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांवर राहणार आहे.

नवीन नियमानुसार आता 3 वर्ष वय असलेल्या बालकांना नर्सरीत प्रवेश मिळणार आहे. चार वर्षे वय असलेल्या बालकांना ज्युनिअर केजी मध्ये प्रवेश मिळणार आहे. पाच वर्षे वय असलेल्या बालकांना सिनियर केजी मध्ये प्रवेश मिळणार आहे.

तसेच सहा वर्षे वय असलेल्या बालकांना पहिलीत प्रवेश मिळणार आहे. यंदा म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये पहिली वर्गात प्रवेश घेण्यासाठी 31 डिसेंबर 2024 ला ज्या बालकांचे वय सहा वर्षे पूर्ण होईल ते बालक पात्र राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe