मुंबई : महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच आता वेगळं वळण घेत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कोर्टात आहे. शनिवारी झालेल्या शपथविधीविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी संयुक्त याचिका दाखल केली होती. यासंदर्भात सोमावरी सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे
जवळपास दीडतास युक्तीवाद झाल्यानंतर कोर्टाने विश्वासदर्शक ठरावाचा निर्णय मंगळवारी 10.30 पर्यंत राखीव ठेवला
विश्वासदर्शक ठराव तातडीने होणार की नाही याचा निर्णय उद्या होणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सह अजित पवार यांना पुन्हा एकदा मोठा दिलासा
उद्या पर्यंत फडणवीस सरकारला दिलासा बहुमत सिद्ध करण्याची तारीख आजही फायनल नाही
उद्या सकाळी साडे दहा वाजता सुप्रीम कोर्ट फैसला ठरविणार !
विश्वासदर्शक ठराव केव्हा घ्यायचा याचा निर्णय उद्या सकाळी साडे दहा वाजता न्यायालय सांगणार
सर्वात ज्येष्ठ आमदारांना हंगामी अध्यक्ष बनवा; तातडीने बहुमत चाचणी घ्या: अभिषेक मनु सिंघवी
अशा प्रकरणांमध्ये न्यायालयानं मागील काही काळात दिलेल्या निर्णयात २४ तासांत बहुमत चाचणी घेण्यात आली आहे. तर काही प्रकरणांमध्ये ४८ तासांचा वेळ देण्यात आला होता,
५४ आमदारांच्या सह्या असतीलही, पण भाजपाला पाठिंब्याचा उल्लेख नाही – राष्ट्रवादी
दोन्ही पक्ष जर विश्वासदर्शक ठरावासाठी तयार आहेत, तर मग कधी? पत्रावर सह्या आहेत, पण पाठिंबा नाही – अभिषेक मनू सिंघवी
54 आमदारांचा पाठिंबा असल्याचं दर्शवत आहेत, पण ते पत्र 54 आमदारांनी नेता निवडीसाठी दिलं आहे, पाठिंब्यासाठी नाही
दोन्ही पक्ष तयार आहेत तर फ्लोरटेस्टमध्ये उशीर का? आमदारांच्या सह्या आहेत पण तिथे आमदार समर्थन देत आहे असं लिहिले नाही
दोन्ही पक्ष जर विश्वासदर्शक ठरावासाठी तयार आहेत, तर मग कधी? पत्रावर सह्या आहेत, पण पाठिंबा नाही – अभिषेक मनू सिंघवी –
अजित पवार यांना पदाहून काढलं आहे, त्यामुळे 24 तासात बहुमत घ्या – कपिल सिब्बल-
राष्ट्रवादीचंही मला समर्थन, अपक्ष आमदार माझ्यासोबत, सर्व आमदारांचं समर्थन ;- अजित पवार
राष्ट्रपती राजवट उठवण्याला आव्हान दिलेलंच नाही: मुकूल रोहतगी (भाजप वकील)
सकाळी 5 वाजता राष्ट्पती राजवट घाईत का हटविली ? – कपिल सिब्बल
माझ्यासोबत १७० आमदार, आणि आम्हाला राष्ट्रवादीचा पाठिंबा- देवेंद्र फडणवीस
राष्ट्रपती राजवट जास्त काळ राहू नये- अजित पवार
न्यायालयात अजितदादांनी दिलेल्या पत्राचा अनुवाद सुरू, ५४ आमदारांच्या सह्यांचं पत्र न्यायालयापुढे सादर
सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात