महाराष्ट्र

महाराष्ट्रातला पहिला सर्वाधिक ८ किलोमिटर लांबीचा बोगदा तयार, बोगद्यात अत्याधुनिक सुसज्ज यंत्रणा

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या महार्गावर महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि देशातील सर्वात रुंद असा ८ किमी लांबीचा अत्याधुनिक फायरप्रूफ बोगदा तयार करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या बोगद्यामध्ये अत्यंत अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. या महामार्गावरील पॅकेज १४ अंतर्गत १३ किलोमीटरचे काम ॲफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर कंपनीकडे दिलेले आहे. या कंपनीने हे काम नियोजित वेळेच्या तीन महिने आधीच पूर्ण केलेय. यात या ८ किमी बोगद्याच्या समावेश आहे.

विशेष म्हणजे या बोगद्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर मुंबई – नागपूर मार्गावर बोगद्यातून वाहनांना बाहेर काढण्यासाठी देखील आपत्कालीन मार्ग काढलाय. या आपत्कालीन मार्गाने वाहनांना नाशिक राष्ट्रीय महामार्गावर जाता येईल. ॲफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर कंपनीने पिंपरी सद्रोद्दिन – वशाळा बुद्रुक या एकूण १३ किलोमिटर महामार्गाच्या कामात २ किलोमिटर उंच पुलाची निर्मिती, ८ किलोमिटर लांबीचा बोगदा आणि तीन किलोमीटर रोड अशा महामार्गाची निर्मिती वेळेपूर्वीच करून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला सुपूर्द केली आहे.

* कंट्रोल रूम मधून बोगद्यातील सुविधांचे नियंत्रण

बोगद्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर तेथील असणाऱ्या सुविधांचे नियंत्रण कंट्रोल रूम मधून करता येणार आहे. विशेष अशा मनुष्यबळाची गरज लागणार नाही. बोगद्यात ३६० डिग्री कॅमेरा, मोबाईल नेटवर्क राहण्यासाठी लिकि केबल यंत्रणा, ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टीम, फायर फायटींग सिस्टिम, स्काडा सिस्टीम अशी यंत्रणा आहे.

* बोगद्यात पुढील प्रमाणे सुविधा

– मोबाईल नेटवर्क येण्यासाठी लीकी केबल

– सीसीटिव्ही कॅमेरे

– आग लागल्यास फायर अलार्म सिस्टीम

– विशेष परिस्थितीसाठी पब्लिक अनाउंस सिस्टीम

– आग विझवण्यासाठी फायर फायटिंग सिस्टीम

– ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टीम

– अक्सेस कंट्रोल सिस्टीम (फायर प्रुफ डोअर)

– रेडिओ कम्युनिकेशन सिस्टीम

* सर्वाधिक उंच पूल

समृध्दी महामार्गाच्या १४ व्या पॅकेज निर्मितीमध्ये हा मोठा बोगदा तर केलेलाच आहे विशेष म्हणजे यात सर्वाधिक मोठ्या अशा ६० मीटर उंचीचा पुलाची निर्मिती देखील केली गेली आहे. हा पूल एकूण १.२९७ किलोमीटरचा असून संपूर्ण फॉरेस्ट झोन असलेल्या डोंगरात या उंच पुलाची जाग्यावरच निर्मिती केली असल्याचे समजते.

* अत्याधुनिक फायर सिस्टीम

आठ किलोमीटर लांबीच्या या बोगद्यात आग विझवण्याची सर्वाधिक काळजी घेण्यात आली आहे. बोगद्यातील तापमान ६० अंशांपेक्षा जास्त वाढल्यास ऑटोमॅटिक हाय प्रेशर मिस्ट सिस्टीम आपोआप सुरू होईल. यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही वाहतूक चालकांना सुरक्षितता मिळणार आहे.

Ahmednagarlive24 Office