अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- राहुरी तालुक्यातील वांबोरी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सत्ताधारी पाटील गटाला सत्तेवरून पाय उतार करत ना. प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब भिटे, सुरेश बाफना,
किसन जवरे यांच्या गटाने १७ पैकी ११ जागांवर विजय मिळवत वांबोरी ग्रामपंचायतीवर आपले निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे.
तर सत्ताधारी सुभाष पाटील गटाला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. वांबोरी ग्रामपंचायत चाळीस वर्ष जि.प.च्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी चेअरमन सुभाष पाटील व डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील गटाच्या ताब्यात होती.
सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी पाटील गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तर महा विकास आघाडी व ना. प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी वांबोरीची हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.
महाविकास आघाडी व पाटील गट यांच्यात समोरासमोर लढत झाली. त्यात बाबासाहेब यांच्या महा विकास आघाडीला १७ पैकी ११ जागांवर विजय मिळाला. विरोधी पाटील गटाला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे.