अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्या (दि.५) मनसेच्या वतीने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इच्छेनुसार फटाके वाजवून धुमधडाक्यात हा उत्सव साजरा करण्याचे नियोजन केलेले असतांना
पोलिस प्रशासनाकडुन मनसेचे जिल्हासचिव नितीन भुतारे व जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांना नोटिस बजावण्यात आली आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
एक प्रकारे मनसेच्या कार्यकर्त्यांची मुस्कट दाबी करण्याचा प्रकार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यांच्या महाविकास आघाडी सरकार कडून सुरु झाल्याचा आरोप नितीन भुतारे यांनी केला आहे.
अश्या प्रकारे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणाऱ्या सरकारचा मनसेच्या वतीने जाहिर निषेध करण्यात येत आहे. सत्तेसाठी हिंदूत्व बाजुला ठेऊन महाविकास आघाडीतील शिवसेनेने 1 कोटी रुपये मदत करणे हा फक्त हिंदुत्वाचा खोटा बुरखा घातलेला आहे.
भुमिपुजनच्या कार्यक्रमाचा आनंद सर्व देशात भाजप साजरा करत असताना नगर शहरात या भुमिपुजन कार्यक्रमाचा उत्सव साजरा करायला मनसेला विरोध का? असा सवाल नितीन भुतारे यांनी केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com