अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : ‘महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल. ज्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीचं सरकार मान्य नसेल तर त्यांनी भारतीय जनता पक्षात यावे.त्यांना सत्ता, पद आणि सन्मान देखील मिळेल,’ अशी प्रतिक्रिया भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी दिली आहे.
विखे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली व करोना अनुषंगाने आढावा घेतला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.ज्यात मंत्री लॉक झाले आणि जनता अनलॉक झाली, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोण कुठे चालले, याचा कोणालाच काही पत्ता नाही,’ अशी टोलेबाजीही त्यांनी केली.
अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना राज्यातील महाविकास आघाडी मान्य नसेल तर त्यांनी भाजपात यावे,’ असं वक्तव्य खा. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
दुर्देवाने राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे येथे कोणाचा मंत्री कुठे फिरत आहे आणि काय निर्णय देतोय, हे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती नसते,’ असा टोला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews