अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- सोलापूर येथे महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
तेव्हा त्या मेळाव्यामध्ये आमदार प्रणिती शिंदे व माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा स्टेजवर लावलेल्या फलकावर फोटो नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला व त्याचे रूपांतर गोंधळात झाले त्यामुळे महाविकास आघाडीच्या चार मंत्र्यांसमोर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता.
यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महाविकास आघाडीवर टीका केली. महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ आहे. या सरकारचा एकाचाही पायपोस कोणाच्या पायात नाही.
तर तीन पक्ष एकमेकाचे नॅचरल अलायन्स नाही हे नैसर्गिक मित्र नसल्याने असेच होत राहणार अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली ते अमरावती पत्रकारांशी बोलत होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved