अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :पारनेर नगर पंचायतीच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या
सुप्त तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या बड्या नेत्यांमध्ये मातोश्रीवर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख,
जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांच्या गोंधळाबाबत चर्चा केली.
याशिवाय, नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा झाली. एकीकडे राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून,
अनेक नागरिकांना याची बाधा झाली आहे. प्रशासन या वेळी कोरोनाशी लढा देत आहे, आणि सरकार मात्र फोडाफोडी करण्यात गुंतले असल्याचे चित्र दिसत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews