Maharashtra News : राज्याचे तीन माजी मुख्यमंत्री शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण व उध्वव ठाकरे हे एका माजी मुख्यमंत्र्यांना विरोध करत आहेत. ज्यांनी मराठा आरक्षण दिले होते, मात्र पुढे ते न्यायालयीन कचाट्यात आडकले आहे.
मात्र, लक्षात ठेवा मराठा समाजाला न्याय देण्याचे काम फक्त देवेंद्र फडणवीस यांनीच केले होते. तसेच अताही महायुतीचे सरकार न्यायालयीन लढाई लढून मराठा आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
पारनेर येथे भारतीय जनता पाक्षाचे कार्यालय व घर चलो अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या हस्ते व डॉ. विखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी डॉ. विखे बोलत होते.
याप्रसंगी प्रदेश कार्यकारीणी सदस्य विश्वनाथ कोरडे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी जिल्हा अध्यक्ष भानुदास बेरड, बाबासाहेब वाकळे, युवा नेते राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष सुनिल थोरात, सचिन वराळ, बाबासाहेब तांबे, वसंत चेडे, सुभाष दुधाडे,
अमोल मैड, युवराज पठारे, ऋषी गंधाडे, अशोक चेडे, दिनेश बाबर, किरण कोकाटे, सोनाली सालके, प्रशांत औटी, विश्वास रोहकले, संभाजी आमले आदी उपस्थित होते.
डॉ. विखे पुढे म्हणाले, जालना येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज समर्थनिय नाही. त्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा आरक्षण देऊन न्या देण्याचे काम केले होते व आताही महायुतीचे सरकारच मराठा आरक्षण दिल्याशिवाय राहाणार नाही.
सध्या राजकारण भरकटत चालले आहे. मिडीयाचा प्रभाव वाढल्याने राजकारणाचे वाटोळे झाले आहे. त्यामुळे नैतिकतेने काम करा, माझा जनसंपर्क कमी आहे, हे मी मान्य करतो. मात्र, मी गेल्या ५० वर्षात जेवढी कामे झाली नाहीत तेवढी कामे केली आहेत.