अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- काल रात्री पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत येथे प्रसिद्ध अभिनेते,दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या गाडीला एका कार ने पाठीमागून धडक दिल्याने संतापलेल्या मांजरेकर यांनी शिवीगाळ करून मारहाण केली ,अशी तक्रार कैलास सातपुते यांनी यवत पोलिसांकडे केली आहे.
या तक्रारी वरून पोलिसांनी महेश मांजरेकर यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. सदर प्रकार हा शुक्रवारी रात्री घडला आहे. महेश मांजरेकर हे सोलापूर च्या दिशेने चालले होते.
मधेच त्यांनी गाडीचा ब्रेक लगावला होता. यामुळे मागून येणाऱ्या कैलास सातपुते यांच्या ब्रीझा गाडीची मांजरेकर यांच्या गाडी ला धडक बसली .
या धडके मध्ये महेश मांजरेकर यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले. हे लक्षात येताच मांजरेकर गाडीतून उतरले आणि त्यांनी कसलाही विचार न करता सातपुते यांना शिवीगाळ केली आणि मारहाण केली.
दारू पिऊन गाडी चालवतो का असे विचारत त्यांनी सातपुते यांना मारहाण केली. अपघातानंतर सातपुते आणि मांजरेकर यांच्या मध्ये झालेल्या वादावादीचा व्हिडिओ सातपुते यांनी सोशल मीडिया वर शेअर केला आहे.
या प्रकरणी यवत पोलिसांनी कलम ३२३,कलम ५०४,कलम५०६ अंतर्गत मांजरेकर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सातपुते हे टेंम्भुर्णी भागातील रहिवासी आहेत. मांजरेकर यांच्या वर गुन्हा दाखल झाल्याने ते चर्चेत आले आहेत.