Mahindra Car Names : देशातील सर्वात शक्तिशाली कार उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाणारी महिंद्रा ही कंपनी आहे. महिंद्राने बाजारात आत्तापर्यंत अनेक शक्तिशाली कार लॉन्च केल्या आहेत.
सध्या कार विक्रीच्या बाबतीत महिंद्रा चौथ्या स्थानावर आहे. कंपनी भारतीय बाजारपेठेत बहुतेक SUV विकते तर कंपनीकडे Marazzo च्या रूपात MPV देखील आहे. महिंद्राकडे वेगवेगळ्या विभागातील बरीच वाहने आहेत परंतु त्या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे त्यांच्या नावाच्या शेवटी O.
कंपनीकडे Mahindra Scorpio, Mahindra Bolero, Mahindra XUV 700, Mahindra Marazzo सारख्या काही लोकप्रिय कार आहेत. या सर्व नावांच्या शेवटी O लिहिलेले दिसेल. अशा स्थितीत प्रश्न पडतो की असे का असे काय कारण यामागे असू शकते? याबद्दलच आम्ही तुम्हाला आज महिती देणार आहे.
महिंद्राच्या गाड्यांच्या नावावर O का असते?
याबद्दल सांगायचे झाले तर याबद्दल आम्हाला पूर्णपणे खात्री नाही, परंतु जर मीडिया स्रोत आणि Quora तज्ञांवर विश्वास ठेवायचा असेल तर, स्कॉर्पिओ आणि बोलेरो ही महिंद्राची दोन सर्वात यशस्वी वाहने होती. दोन्ही नावे ‘O’ ने संपतात, महिंद्राचे या दोन्ही गाड्यांनी भाग्य उजळलेले आहे. म्हणून त्यावर आधारित सर्व वाहनांची नावे दिली आहेत.
काहीजण याला अंधश्रद्धा देखील म्हणू शकतात, परंतु जर आपण तार्किकदृष्ट्या विचार केला तर तो एक नमुना राखून कारची नावे एकसमान बनवते. महिंद्राच्या व्यावसायिक वाहनांची नावे देखील ‘O’ ने समाप्त होतात. यामध्ये – Maxximo, Jeeto, Supro आणि Truxo. आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे ‘ओ’ हे अक्षर इंग्रजी भाषेत वापरले जाणारे चौथे सर्वात लोकप्रिय अक्षर आहे.
होंडा मोटरसायकलची नावे
केवळ महिंद्राच नाही तर इतर कंपन्याही अशाच धोरणाचा अवलंब करतात. उदाहरणार्थ होंडा मोटरसायकल. जपानी कंपनीकडे मोटरसायकल आहेत ज्या ‘er’ ने संपतात – ट्विस्टर, स्टनर, ट्रिगर आणि डॅझलर. यामागेची असेच काहीतरी कारण निश्चित असू शकते.