अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अंमलबजावणीला स्थगिती दिल्याने मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
यामुळे आता जिल्ह्यातही आरक्षणाची ज्योत पेटलेली आहे. जिल्हाभर मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी संसदेत स्वतंत्र कायदा करावा अशी मागणी आज जिल्ह्यात करण्यात आली आहे.
यामागणीचे निवेदन नगर तहसिलदार उमेश पाटील यांना आज दुपारी मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजातर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी अॅड. शिवजीत डोके, अॅड. विक्रम वाडेकर, प्रा. संजय अनभुले, यशवंत तोडमल, बाळासाहेब पवार, विशाल म्हस्के, दादा दरेकर उपस्थित होते. दरम्यान या निवेदनात म्हंटले आहे कि,
मराठा आरक्षण निर्णय होईपर्यंत नोकर भरती करण्यात येऊ नये. एमपीएससीच्या परिक्षा होउ न देता त्या पुढे ढकलाव्यात. एसईबीसी प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेशासाठी
अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांची हानी टाळण्यासाठी राज्य सरकारने आपल्या नियंत्रणाखाली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये १२ टक्के जागा विद्यार्थांसाठी वाढवाव्या.
ईडब्ल्यूएसमध्ये नव्हे तर हक्काचे स्वतंत्र आरक्षण मिळावे. सारथी संस्था व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास भरीव निधी द्यावा. तसेच मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र अद्यायावत वसतीगृहे सुरु करावीत.
कोपर्डी अत्याचार घटनेतील आरोपीवरील मुंबई उच्च न्यायालयातील खटल्याचे कामकाज जलद गतीने सुरु करावे. आदी मागण्यांचे निवदेन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved