‘तनपुरे’च्या संचालक मंडळाकडून गैरव्यवहार ; कोट्यवधी रुपये…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखाना बऱ्याचदा अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला जिल्ह्याने पहिला आहे.

कधी कामगार तर कधी वेतन प्रश्न तर कधी गैरव्यवहार याना त्या कारणामुळे हा कारखाना चर्चेत राहिला आहे. आता पुन्हा एकदा या कारखाण्याच्या संचालक मंडळावर गैरव्यवहार करण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

“डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखाना व संलग्न संस्थांच्या जमिनी, भंगार, मोलॅसिस कवडीमोलाने विकून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला.

आता आसवनी प्रकल्पाचे देशी दारू व स्पिरीट उत्पादनाचे लायसन्स विकण्याचा घाट घातला आहे. जिल्हा बॅंकेने यासाठी परवानगी देऊ नये, अन्यथा सभासद शेतकरी आंदोलन करतील,”

असा इशारा रामदास धुमाळ विचार मंचाचे अध्यक्ष अमृत धुमाळ यांनी दिला आहे. मुसळवाडी (ता. राहुरी) येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रवरा शेतकरी मंडळाचे अध्यक्ष अरुण कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे आदी यावेळी उपस्थित होते. “तनपुरे कारखान्यात मागील चार वर्षांत अनागोंदी कारभार झाला.

वार्षिक सभेत विषय घेऊन, सभासदांना विश्वासात न घेता कारखान्याच्या व संलग्न संस्थांच्या मालमत्ता विक्रीचे निर्णय घेण्यात आले. वीस कोटींचे भंगार दोन कोटींना विकले.

जमिनी कवडीमोलाने विकल्या. दोन गळीत हंगामांतील मोलॅसिस विक्रीत मोठा भ्रष्टाचार केला. अगोदरच आर्थिक संकटात असलेला कारखाना आणखी संकटाच्या खाईत लोटला. आदी आरोप त्यांनी केले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24