मानसी नाईकचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अभिनेत्री मानसी नाईकचा रांजणगाव येथील एका कार्यक्रमात विनयभंग करणाऱ्या तरुणाला रांजणगाव पोलिसांनी शनिवारी अटक केली. अजय अशोक कल्याणकर (२३, रा. हवेली, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

साऊंड असिस्टंट अजय कल्याणकर याला पुण्यातील स्वारगेट भागातून बेड्या ठोकण्यात आल्या. पुण्याच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपल्याशी गैरवर्तन झाल्याची तक्रार मानसीने मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

त्यानंतर हे प्रकरण पुण्यातील रांजणगाव पोलिसांत वर्ग करण्यात आले होते. रांजणगाव येथे ५ फेब्रुवारी राेजी अभिनेत्री मानसी नाईक हिला एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले हाेते.

कार्यक्रमादरम्यान डीजेमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मानसीला बाेलण्यासाठी आयाेजक डाॅ. संताेष पाेटे व कल्याणकर स्टेवर अाले. या वेळी कल्याणकरने तिचा विनयभंग करून तेथून पळ काढला. त्यामुळे तिने पोटे यांना विचारणा केली असता त्यांनीही मानसीला दमदाटी केली.

अहमदनगर लाईव्ह 24