मंगलदास बांदलची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम / पुणे : एका नामांकित सराफाकडे ५० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची पुणे पोलीस चौकशी करीत आहेत.

हेच प्रकरण त्यांच्या अंगलट आले आहे. त्यामुळे बांदल यांची शनिवारी (ता.१४) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या सराफाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीमध्ये बांदल यांचा वारंवार उल्लेख केला होता,

तसेच मुख्य आरोपी रूपेश याच्याशी ओळख करून दिली होती. त्यामुळे बांदल हाच यामागचा प्रमुख सूत्रधार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24