Mango on EMI : ठिकाण पुणे ! आता चक्क हप्त्यावर मिळणार हापूस आंबा; असेल इतका EMI…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mango on EMI : पुणे हे असे शहर आहे जिथे शहरातील विकासासोबत लोकांचे विचारही खूप आघाडीचे आहेत. पुण्यातील लोक कधी काय करतील याचा कोणालाच नेम नसतो, मात्र त्यांची ही कृती सर्वांना भुरळ पाडते.

दरम्यान सध्या आंब्याचा सीजन सुरु झाला असून बाजारात विविध प्रकारचे आंबे येण्यास सुरुवात झाली आहे. अशा वेळी आंबा प्रेमींना रसरशीत आंब्यांचे वेढ लागले आहे. यातील लोकांना सर्वात जास्त आवडला जाणारा आंबा म्हणजे हापूस पायरी आंबा आहे.

अशा वेळी पुण्या मधील एका आंबा विक्रेत्यांने आंबा प्रेमींसाठी एक खास ऑफर केली आहे. या ठिकाणी चक्क EMI वर हापूस आंबा विकत मिळत आहे. आपला या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये ना? मात्र हे अगदी 100 टक्के खरं आहे.

गुरू सणस या नावाच्या व्यापाऱ्याने ही ऑफर या वर्षी चालू केली आहे.यामुळे आता आंबा प्रेमी नागरिकांना पैशांची चिंता करावी लागणार नाही.त्यांना मनसोक्त आंब्यांचा आनंद लुटता येणार आहे.

ही जबरदस्त आयडिया पुण्या मधील असणारे व्यापारी गुरू सणस यांची आहे. गुरू सणस चक्क हप्त्यावरून हापूस आंब्यांची विक्री करत आहेत. या संदर्भात गुरू यांनी पेटीएम बरोबर कॉन्ट्रॅक्ट देखील केला आहे. गेल्या सुमारे बारा वर्षांपासून गुरू सणस हे पुण्यामध्ये आंबे विक्रीचा व्यवसाय करत आहेत.

पुण्यातील सनसिटी रोड या ठिकाणी आनंद नगर परिसरात सणस यांचे दुकान आहे. चालू वर्षांपासून गुरू सणस यांनी त्यांच्या दुकानात हप्त्यात आंबे विक्री करायला सुरुवात केली आहे. EMI वर ते नैसर्गिकरित्या पिकवलेला देवगड हापूस आंबा देत आहेत.

गुरू यांना कशी सुचली कल्पना

EMI वर आंबा विक्री ही कल्पना कशी सुचली याबद्दल सांगत असताना व्यावसायिक गुरू सनस म्हणाले की, लॉकडाउन काळात पाहिलं की, लोकांचा पगार खूपच कमी झाला होता. बरेच जणांना आंबे घेणं परवडत नव्हतं. त्यामुळे लोक हे मुलं हट्ट करत असुनही आंबे घेऊ शकत नव्हते.

तर बरीच माणसे हे फक्त लहान मुलांसाठी 4-5 आंबे घ्यायचे. त्यामुळं वेगळं काही तरी करण्याचा विचार केला. त्यावेळी त्यांनी पेटीएमची मशीन विकत घेतली. त्यावेळी पेटीएम कंपनी बरोबर या विषयावर चर्चा केली. त्यांनी ईएमआय सुविधा सुरु करुन दिली.

या करीता हे कार्ड असणं आवश्यक?

हापूस आंबा EMI वर खरेदी करायचा असेल तर त्यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. त्या म्हणजे ईएमआयवर आंबे खरेदी करायचा असेल तर त्या व्यक्तीकडे बँकेचे डेबिट अथवा क्रेडीट कार्ड गरजेचं आहे.

संबंधित असणारी बँकच ग्राहकाला 3 ते 12 महिन्यांपर्यंत EMI बांधून देते. गुरू सणस यांच्याकडून काही ग्राहकांनी आंबे देखील खरेदी केले आहेत. एका ग्राहकाने गुरू कडून 30 हजारांचे आंबे खरेदी केले आहेत. आता त्यांना वर्षभरासाठी प्रत्येक महिन्याला 2500 रुपये हप्ता पडणार आहे.

या बद्दल ग्राहकांची प्रतिक्रिया काय?

आजवर आपण मोबाईल टीव्ही,इलेक्ट्रिक वस्तू, फ्रीज, अशा घरगुती वापराच्या महागड्या वस्तु ईएमआयवर घेत होतो. पण आता पुण्या मधील एका दुकानदाराने चक्क हप्त्यावर हापूस आंबा उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तसंच एकदाच ग्राहकांच्या खिशावर ताण पडणार नसल्यामुळे ग्राहकही खूपच आनंदात आहेत.