मनोज जरांगे पाटील यांच्या शिंदे सरकारकडे 7 मागण्या, उद्या बारा वाजेपर्यंतचा वेळ…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Manoj Jarange Patil : गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात खूपच चर्चेत आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांनी भव्य मोर्चा काढला आहे.

हा मोर्चा मुंबईला जाणार असून मुंबई येथील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. खरंतर पाटील हे आजच आझाद मैदानात जाणार होते. मात्र त्यांनी सरकारला थोडासा अवधी दिलेला आहे. पाटील यांची सकाळी सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे.

मात्र असे असले तरी पाटील यांनी शिंदे सरकारकडे सात मागण्या ठेवल्या असून त्यांनी शासन निर्णयाची मागणी केलेली आहे. उद्या बारा वाजेपर्यंत शासन निर्णय मिळाला नाही तर ते आझाद मैदानाकडे आगेकूच करणार आहेत.

तसेच जर शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्यात तर विजयाचा गुलाल ते मुंबईला घेऊन जाणार आहेत. पाटील यांनी मागण्यांसंदर्भात आज रात्री अध्यादेश द्यावा नाहीतर हे आंदोलन असेच सुरू राहणार असा इशारा यावेळी सरकारला दिला आहे.

तसेच एकदा आझाद मैदानाकडे निघालो मग माघारी फिरणार नाही असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. यासाठी त्यांनी उद्या बारा वाजेपर्यंतचा वेळ शासनाला दिलेला आहे. यामुळे आता शासनाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य होतात का आणि याबाबतचा अध्यादेश निर्गमित केला जातो का ?

हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. एकंदरीत, मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारची चर्चा जवळपास सकारात्मक झाली आहे. मात्र पाटील यांनी मौखिक आश्वासनावर विश्वास न ठेवता अध्यादेशाची मागणी केलेली आहे.

यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार हे खरच पाहण्यासारखे राहणार आहेत. दरम्यान आता आपण मनोज जरांगे पाटील यांनी सरकार पुढे ठेवलेल्या सात मागण्या थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

१) नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्यावे, शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
२) कोर्टात आरक्षण मिळेतपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करावे.
३) जिल्हास्तरावर वसतिगृह तयार करावे.
४) आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, भरती केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा
५) आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या.
६) SEBC अंतर्गत २०१४ च्या नियुक्त्या त्वरित घ्या
७) वर्ग १ व २ आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या.