राजधानी मुंबईकडे मराठ्यांची आगेकूच, मनोज जरांगेनी सांगितलं मराठा आंदोलनाच संपूर्ण टाईम टेबल, कोणत्या तारखेला काय ? पहा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maratha Aandolan : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा चर्चेत आला आहे. याआधी देखील राज्यातील मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी केली जात होती.

यासाठी शेकडो संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी तसेच काही मराठा राजकर्त्यांनी शासनाकडे मोठा पाठपुरावा केला. कोल्हापूर गादीचे छत्रपती आणि सातारा गादीचे छत्रपती देखील मराठा आरक्षणासाठी सातत्याने शासनावर दबाव बनवत आहेत.

वेळप्रसंगी आंदोलनांच देखील हत्यार उपसल जात आहे. मात्र, शासन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर टाळाटाळ करत आहे. शासनाकडून फक्त आणि फक्त वेळ काढूपणा केला जात आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण चा पर्याय स्वीकारला आहे.

आतापर्यंत पाटील यांनी दोन वेळा सरकारला अल्टीमेटम दिले आहे. सरकारने दोन्ही वेळा पाटील यांना आश्वासन देऊन आमरण उपोषण सोडायला भाग पाडले आहे. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही निकाली निघू शकलेला नाही. यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील तमाम मराठा बांधवांना राजधानी मुंबईकडे आगे कूच करण्याचे आवाहन केले आहे.

20 जानेवारीला पाटील यांनी चलो मुंबईची हाक दिली आहे. पाटील यांनी मराठ्यांच्या मुलांच्या निकटवर्ती भविष्यासाठी काही दिवस शेतीच्या कामाला रजा टाका आणि मुंबईकडे निघा असा संदेश देत मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मराठ्यांना सहभागी होण्याचे विनम्र आवाहन देखील केले आहे.

विशेष म्हणजे या मराठ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी मिळेल त्या वाहनात मुंबईच्या दिशेने आगे कूच करा असे पाटील यांनी नमूद केले असून या आंदोलनाची संपूर्ण रूपरेषा त्यांनी समोर ठेवली आहे. या आंदोलनाचे टाईम टेबल नेमके कसे राहणार, चलो मुंबई या आंदोलनात नेमक्या कोणत्या दिवशी काय होणार याबाबत जरांगे पाटील यांच्या माध्यमातून महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

काल अर्थातच मकर संक्रांतीच्या दिवशी जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथून ही माहिती दिली आहे. मराठा आरक्षणाच्या या आगामी आंदोलनाचा रोड मॅप समोर आलेला नव्हता. आता मात्र पाटील यांनी याबाबत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे.

हे आंदोलन अंतरवली सराटी येथून ते मुंबई पर्यंत कसे राहणार, या आंदोलनादरम्यान कोणकोणत्या ठिकाणी मुक्काम होणार याबाबत सविस्तर माहिती समोर आलेली आहे.

अंतरवली ते मुंबई आंदोलनाच्या प्रवासातील टप्पे कसे राहणार

मिळालेल्या माहितीनुसार 20 जानेवारीला सकाळी नऊ वाजता अंतरवली येथून आंदोलनकारी निघणार आहेत. मराठा आंदोलनकर्त्यांचा पहिला दिवसाचा मुक्काम हा बीड जिल्ह्यातील शिरूर येथील मातोरी डोंगरपट्ट्यात होणार आहे.

विशेष म्हणजे या आंदोलनात ज्यांना चालता येईल त्यांनी चालायचे आहे नाहीतर बिनधास्त वाहनात बसायचे आहे. सर्वांनी दुपारी बारापर्यंत चालायचे आहे. या आंदोलनाचा दुसरा मुक्काम म्हणजे 21 जानेवारी चा मुक्काम हा अहमदनगर जिल्ह्यातील करंजी घाट बाराबाभळी येथे होणार आहे.

या आंदोलनाचा तिसरा मुक्काम म्हणजेच 22 जानेवारी चा मुक्काम हा पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे होणार आहे. या आंदोलनाचा चौथा मुक्काम म्हणजेच 23 जानेवारी चा मुक्काम हा खराडी बायपास पुणे येथे होणार आहे. या आंदोलनाचा पाचवा मुक्काम म्हणजेच 24 जानेवारी चा मुक्काम लोणावळा येथे राहणार आहे.

या आंदोलनाचा सहावा मुक्काम म्हणजेच 25 जानेवारी चा मुक्काम वाशी, नवी मुंबई येथे होणार आहे. या आंदोलनाचा सातवा मुक्काम म्हणजेच 26 जानेवारीचा मुक्काम आंदोलन स्थळी अर्थातच राजधानी मुंबईच्या आझाद मैदानात होणार आहे. पाटील यांनी या आंदोलनासाठी राजधानी मुंबईतील आझाद मैदान आणि शिवाजी पार्क ही दोन्ही मैदान लागतील असे म्हटले आहे.

राजधानी मुंबईत आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर आंदोलनाचे शिल्पकार मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत. 26 जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिनी या आंदोलनाची सुरुवात होणार आहे.

अंतरवली सराटी येथून अख्या महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील मराठा मनाला एक करण्याचे काम करणारा हा अवलिया आता मराठा आरक्षणासाठी राजधानी दरबारी आंदोलन पुकारणार असल्याने यामुळे सरकारची झोप उडाली आहे.

यामुळे आता या आंदोलनातून मराठा समाजाला आंदोलन मिळते का, मनोज जरंगे पाटलांच्या या भूमिकेवर सरकार कसा प्रतिसाद देते, मराठा समाजाला आंदोलन मिळाले नाही तर जरांगे पाटील उपोषण सोडणार का आणि दुसरा मार्ग अवलंबणार का असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत.

आंदोलनकर्त्यांना केले हे आवाहन

जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना काही गोष्टींची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी त्यांच्या हद्दीपर्यंत चालायचे आहे. मुंबईला आंदोलनात सहभागासाठी जाणाऱ्यांनी आपल्या वस्तू घरूनच आणायच्या आहेत.

ज्या जीवनावश्यक वस्तू असतील त्या साऱ्या घरूनच आणायच्या आहेत. तसेच या आंदोलनादरम्यान मुक्काम स्थळी झोपताना आपल्या वाहनाजवळच झोपायचे आहे. या आंदोलनात कोणीही व्यसन करायचे नाही अशी तंबी पाटील यांनी दिली आहे. मुंबईला जाताना प्रत्येकाने स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे.

यामुळे ज्यांच्याकडे टँकर असेल जनरेटर असेल ते घेऊन मुंबईकडे निघा, आपल्या लेकरा बाळांसाठी त्यांच्या भविष्यासाठी पुन्हा एकदा मुंबई गाठा असे महत्त्वाचे आवाहन यावेळी पाटील यांनी केले आहे. आंदोलनात 90 ते 100 किलोमीटरच्या आत मुक्काम राहणार आहे.

या आंदोलनाला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला सरळ पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल असे पाटील यांनी म्हटले आहे. टीव्हीवर दिसण्यासाठी स्टंट करायचा नाही अशी तंबीही त्यांनी दिली आहे.