अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. या आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी याबाबत पुढाकार घेऊन
आणि पंतप्रधानांना भेटून या प्रश्नाविषयी मार्ग कसा काढता येईल याबाबत चर्चा करावी अशी विनंती या शिष्टमंडळाने केली आहे. मराठा आरक्षणामुळे मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.
हा प्रश्न समाजाच्या जिव्हाळ्याचा असल्याने आपण याबाबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर समाजाच्या भावना घालाव्यात अशी विनंती केली आहे.
या प्रश्ना बाबत सकारात्मक चर्चा होईल असा विश्वास खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला खासदार रक्षा खडसे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे ,खासदार डॉक्टर भारती पवार, खासदार डॉ.हीना गावित,
खासदार उन्मेष पाटील आणि खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी खा. छत्रपती संभाजी महाराज यांची भेट घेऊन मराठा आरक्षणा संदर्भात चर्चा केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved