Maratha Reservation : २०१९ सालच्या अभियांत्रिकी सेवाभरतीतील मराठा समाजाच्या उमेदवारांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. १११ मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस कोट्यातून नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा नियुक्ती बेकायदा व मॅटच्या निर्णयाला उच्च न्यायालयानो स्थगिती दिली आहे.
यामुळे याकडे तरुणांचे मोठे लक्ष लागले आहे. यामुळे १११ मराठा उमेदवारांचे आता नियुक्तीवरील आक्षेप दूर झाले आहेत. या निर्णयानंतर ही नियुक्ती आता कायम राहणार आहे. यामुळे तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२०१९ सालच्या अभियांत्रिकी सेवाभरतीतील मराठा समाजाच्या उमेदवारांना हा मोठा दिलासा देणारा निर्णय न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, मराठा उमेदवारांना आर्थिक मागास प्रवर्गातून दिलेली नियुक्ती बेकायदा ठरवण्याच्या ‘मॅट’च्या निर्णयाला प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
खंडपीठाने राज्य सरकार आणि मराठा उमेदवारांची सविस्तर बाजू ऐकून घेण्यास तयारी दर्शविली आहे. ‘मॅट’च्या निर्णयानंतर ईडब्ल्यूएस कोटय़ातील सरकारी नोकरी अडचणीत सापडल्याने धास्तावलेल्या मराठा उमेदवारांचे आता उच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, 2019 च्या अभियांत्रिकी सेवा भरतीमध्ये मराठा उमेदवारांना एसईबीसी कोटय़ातून दिलेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर अडचणीत सापडली. यामुळे तरुणांना मोठा धक्का बसला होता.