‘मराठा समाज ओबीसीत नको’ ; अहमदनगरमध्ये आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगीती दिल्यानंतर अनेक मराठा नेते व मराठा संघटना,मराठा समाजाचा समावेश ओ.बि.सी.संवर्गात समावेश करुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करत आहे.

हि मागणी चुकीची असुन ओबिसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करु नये, अशी मागणी आता ओबीसींमधून होऊ लागली आहे.

यासंदर्भातच जय भगवान महासंघाने नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करू नये, अशी मागणी केली आहे.

मराठा समाजाची ओबीसीकरण करू नये व ओबीसीच्या आरक्षणाचे संरक्षण करावे अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाच्या मार्फत महासंघाने मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविले आहे.

यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे, जिल्हाध्यक्ष रमेश सानप, उपाध्यक्ष मदन पालवे आदी उपस्थित होते. या निवेदनामध्ये या मागणीबरोबरच 2021 ची सार्वत्रिक जनगणना केंद्रसरकार जातीनिहाय करणार नसेल तर राज्य सरकार मार्फत राज्यात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी,

पुढे ढकलण्यात आलेल्या एमपीएससी वा अन्य सर्व प्रकारच्या परीक्षा कोणाच्याही दबावाची पर्वा न करता ताबडतोब घेण्यात याव्यात, अकरावीची प्रवेश प्रक्रिया विनाविलंब सुरू करण्यात यावी,

सरकारी सेवांमधील ओबीसींचा अनुशेष लवकरात लवकर भरण्यात यावा , ओबीसी समाजाचे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नंदुरबार, धुळे, ठाणे,

नाशिक व पालघर जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत 19 टक्के करण्यात यावे. सरकारी सेवेतील ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करावे आदी मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24