कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्काराची नियमावली काय ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे, राज्यात सध्या 1 हजाराहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान दुसरीकडे मृतांचा आकडा देखील वाढत चालला आहे. आज नागपूरमध्ये देखील पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत कठोर नियमावली जारी केली आहे 

तसेच कोरोनाग्रस्त मृतदेहांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी या मार्गदर्शक तत्त्वांचं कठोर पालन करण्याचे निर्देश मुंढे यांनी दिले आहेत.

1. कोरोनाग्रस्त मृतदेहांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी मृतदेहाला कुणीही स्पर्श करु नये

 2. मृतदेहावर अंत्यविधी करताना 5 पेक्षा अधिक लोकांनी उपस्थित राहू नये

3. संबंधित रुग्णालय प्रशासनाने मृत्यूची माहिती आधी संबंधित पोलिस स्टेशनला द्यावी

. 4. मृतदेहाला कुणी स्पर्श करणार नाही आणि अंत्यविधीला पाचपेक्षा जास्त लोक उपस्थित राहणार नाहीत, याची खातरजमा झाल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करणे 

5. अंत्यविधी करण्यात येणारे घाट किंवा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी मास्क, ग्लोव्ह आणि अन्य सुरक्षा साहित्यांचा वापर करणे अत्यावश्यक.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

 

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24