अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिने आपल्या कलाकारी आणि अदाकारीने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
तसेच आपल्या अभिनय कौशल्यावर तिने हिंदी, मराठी, बंगाली, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेतील फक्त चित्रपटच नाही तर वेबसीरिज व लघुपटात काम केले आहे.
परंतु आता तिच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. राधिका आता ‘अ कॉल टू स्पाय ‘ या इंटरनॅशनल फिल्ममध्ये झळकणार आहे. या चित्रपटाची घोषणा खुद्द तिनेच इंस्टाग्रामवर केली आहे.
यात राधिका नूर इनायत खान नामक हेरची भूमिका साकारणार असून तिच्यासोबत विर्जिना हॉलच्या भूमिकेत सारा मेघन थॉमस दिसणार आहे. नूर व विर्जिनाची निवड वेरा अॅटकिन्स वर्ल्ड वॉर टूच्या मिशनसाठी निवड करतो.
अ कॉल टू स्पाय सिनेमाची स्टोरी वर्ल्ड वॉर टूमधील महिला हिरोंची माहित नसलेली स्टोरी दाखवण्यात येणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अ कॉल टू स्पाय चित्रपट आयएफसी फिल्मने घेतला आहे. राधिकाने सोशल मीडियावर गुड न्यूज देत सांगितले की, या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे राइट्स नॉर्थ अमेरिकेतील प्रोडक्शन कंपनीने घेतले आहेत.यासोबत तिने या सिनेमातील तिचा फोटोही शेअर केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews