अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- मुंबई येथे घर घेण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत शारीरिक व मानसिक छळ करणारा पती, तसेच सासू, सासरा व इतर दहा लोकांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी बुशरा असलम मन्सुरी (हल्ली राहणार सोनगाव सात्रळ) या विवाहितेने बुधवारी फिर्याद दिली.देवटाकळी (सटाणा) येथे सासरी नांदत असताना पती,
सासू-सासरे व इतरांनी मुंबईला घर घेण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. या रकमेची पूर्तता झाली नसल्याने
३१ ऑक्टोबर २०१९ ते १२ मे २०२० या कालावधीत सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी नवरा असलम मन्सुरीसह सासरा, सासू व इतर १० नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात अाला. पुढील तपास पोलिस नाईक संजय राठोड करीत आहेत.