महाराष्ट्र

महाराष्ट्रातील बाजार समित्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार – बाळासाहेब नाहाटा

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : पणन सुधारणेमुळे होणाऱ्या संपूर्ण शेतीमालाच्या नियमनमुक्ती नंतर बाजार समित्यांच्या उत्पन्नाचे स्रोत कमी होऊन बाजार समित्यांचे उत्पन्न घटणार आहे, परिणामी बाजार समित्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

बाजार समित्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी विविध शिफारशी शासनाकडे करणार असून, महाराष्ट्रातील बाजार समित्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या अध्यक्षतेखाली, उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे संपन्न झाल, या वेळी ते बोलत होते.

या वेळी उपसभापती संतोष सोमवंशी, माजी आमदार केशवराज मानकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, मुंबई बाजार समिती सभापती अशोकराव डक, पोपटराव सोनवणे, दामोदर नवपुते, आनंदराव जगताप, संजय कामनापुरे,

दिनेश चोखारे, बाबाराव पाटील, पंढरीनाथ थोरे, संदीप काळे, सौ. रंजना कांडेलकर, कार्यकारी संचालक किशोर कुलकर्णी समिती यांच्यासह महाराष्ट्रातील बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी अनेक प्रश्नांबाबत ठराव पारित करण्यात आले. अंत्यत खेळीमेळीच्या वातावरणात संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

Ahmednagarlive24 Office