अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- लग्न करायला मांडवात उभ्या राहणाऱ्या मुलींच्या अपेक्षा खूप मोठ्या असतात. मुलगा सरकारी नोकरीला हवा,त्याच्याकडे चारचाकी गाडी असावी,त्याचा शहरात टुमदार फ्लॅट असावा अशा अपेक्षेने मुली मुलांच्या शोधात असतात.
पण महाराष्ट्रातील एका तरुणीने एक धाडसी निर्णय घेतला आहे.महाराष्ट्रातील प्राजक्ता पाटील हिने कर्नाटकातील प्रगतिशील शेतकरी अमोल करडे पाटील यांची आयुष्यभराचा जीवनसाथी म्हणून निवड केली आहे.
त्यांच्या विवाहासाठी सजवलेल्या गाडीची आणि लग्नाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. कोरोनाच्या साथीमुळे अनेक लग्न थांबले होते. पण जस जस लॉकडाऊन उठत गेल तस तस लग्न व्हायला सुरुवात झाली.
लग्नाच्या मांडवात मुलगी उभ राहताना स्वप्न खूप मोठे मोठे पाहते. नोकरदार मुलगा हवा अशी मुलींची अपेक्षा असते. कोणालाही शेतकरी मुलाशी लग्न करायचे नसते.
पण महाराष्ट्रातील प्राजक्ता बाबासो पाटील – चंद्रे हीने शेतकरी असलेल्या कर्नाटकातील कुन्नूरच्या अमोल बाळासो करडे-पाटील या प्रगतिशील शेतकऱ्याशी लग्न केले आहे.
तिने हा निर्णय घेताना शेतकरी पण काय कमी नाही हे दाखवून दिले आहे.त्यांचा विवाह कर्नाटक राज्यात थाटामाटात पार पडला.विवाहासाठी सजवलेल्या चारचाकी गाडीची चर्चा सोशल मीडियात रंगली होती.
गाडीच्या बोनेटवर शेतकरी नाव फुलांनी सजवले होते. टपावर शिवरायांची मूर्ती, मागच्या बाजूला ‘लेक तुमची लक्ष्मी आमची, असे लिहिले होते. शेतीत पिकवलेल्या पानाफुलांनी गाडी सजवली होती.
“प्रत्येक मुलीची अपेक्षा डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापाक मुलगा असावा अशी असते मात्र आपल्या जन्मदात्याने कष्ट करून शेती सांभाळली.
त्याचा स्वाभिमान बाळगण्यासाठी शेतीशिवाय पर्याय नाही. म्हणून मी शेतकरी मुलाची निवड केली. मला माझ्या निर्णयाचा अभियान आहे. -प्राजक्ता पाटील