मास्क हीच बेस्ट व्हॅक्सिन : पोलीस अधीक्षक पाटील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव… अहमदनगर – कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. कधीपर्यंत राहणार हे सांगता येत नाही. तसेच कोरोनावर अद्याप लस देखील आलेली नाही.

त्यामुळे सध्या मास्क हीच बेस्ट व्हॅक्सिन आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले.

कोरोनाकाळात रुग्ण, हॉस्पिटल व पायी जाणाऱ्या नागरिकांना आवश्यक सेवा देणाऱ्या स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.

त्यावेळी पोलीस अधीक्षक पाटील बोलत होते. ते म्हणाले, लोक आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी रस्त्यावर उतरून काम करत आहेत.

त्यांच्या या कामाची मनापासून कृतज्ञता, आभार व कोरोनाला हरवण्याच्या लढाईत सहभागी सर्वांचा सन्मान करावा, या हेतुने हा सत्कार केला. कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. कोरोनावर मात करण्यासाठी व्हॅक्सीन निघालेली नाही,

सध्यातरी फेस मास्कच बेस्ट व्हॅक्सीन आहे. हा लढा कुणा एकट्याचा नाही. त्यामुळे यापुढे सर्वांनी शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करत एकत्रितपणे लढा देऊन कोरोनावर मात करू, असे आवाहन पाटील यांनी केले.

याप्रसंगी रुपेश भंडारी, सचिन पेंडूरकर, रेश्मा चारानिया, शहाजमिन चारानिया उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24