अतिवृष्टीने भातशेतीची प्रचंड नासाडी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे.

अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अकोले तालुक्‍यातील विविध भागात यंदा जोरदार पाऊस झाला आहे. विशेषत: भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील आदिवासी भागात सरासरीपेक्षा अधीक पाऊस झाला.

त्यामुळे आदिवासी भागातील भात पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी, महसूल विभागाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी,

अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्‍यातील पांजरे, उडदवणे, साम्रद या भागातील पन्नासपेक्षा अधीक शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

शनिवारी अचानक पाऊस सुरू झाला. हा पाऊस इतका जोरदार होता की, कमरापर्यंत उभे राहिलेले भात पिके अक्षरश: झोपली.

त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या हाताला भात पिक मिळणार नसल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरवातीच्या २ महिन्यातच जिल्ह्यात १३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस

काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. वयाची पन्नाशी गाठलेल्या आजच्या पिढीने कधीच पाहिला नाही असा पाऊस यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून होतोय.

सुरुवातीला तो चांगला वाटला. खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या झाल्या. कुणालाच वाटलं नाही आज चांगला वाटणारा पाऊस पुढे नकोसा होईल. आज अनेक ठिकाणी या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24