MC Stan-Golden Boys : बिग बॉस 16′ चा विजेता एमसी स्टॅन गेल्या काही काळापासून अब्दू रोजिकसोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. मात्र आता स्टेन आणि अब्दुल यांच्यातील लढतीबाबत गोल्डन बॉईज सनी वाघचोरे आणि संजय गुजर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यावेळी यावेळी गोल्डन बॉईजने एमसीला सल्लाही दिलेला आहे. तसेच या दोघांनी एमसी स्टॅनला गर्विष्ठ म्हटले आहे. त्यांच्या या टीकेमुळे सोशल मीडियावर अनेक कॉमेंट्स येऊ लागल्या आहेत.
सनी नाना वाघचौरे आणि संजय गुजर हे एमसीचे अगदी जवळचे मित्र आहे. ‘बिग बॉस 16’मध्येही त्यांनी एण्ट्री केली होती. यावेळी एमसीबरोबर असलेली त्यांची मैत्री दिसून आली. पण आता एमसीबाबत त्यांचं मत बदललं आहे. पापाराझी छायाचित्रकारांनी जेव्हा एमसी व अब्दूमधील वादाबाबत गोल्डन बॉइजला विचारलं तेव्हा त्यांनी एमसीलाच एक सल्ला दिला आहे.
काय म्हणाले गोल्डन बॉईज?
सनी म्हणाला, “स्टॅनचं वागणंच वेगळं आहे. त्याला आता गर्व झाला आहे. लोकांवर प्रेम करणंही गरजेचं आहे हा आमचा संदेश त्याच्यापर्यंत नक्की पोचवा. प्रसिद्धी आज आहे पण उद्या असणार की नाही हे कोणालाच माहित नाही. मात्र लोकं तुझ्याबरोबर कायम असणार आहेत. तसेच जी लोकं तुझ्या पाठी कायम उभी राहत होती त्यांना विसरु नको”.
“कारण यामुळे आयुष्यामध्ये खूप अडचण निर्माण होऊ शकतात. मोठा भाऊ या नात्याने आम्ही त्याला हे समजावत आहोत. स्टॅनला या गोष्टीचं वाईट वाटलं तरी हरकत नाही”. एमसीचं वागणं गोल्डन बॉइजला अजिबात पटलं नाही. अब्दूशी एमसीचा झालेला वाद तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण यामध्ये अब्दूला गोल्डन बॉइजने पाठिंबा दिला आहे. असे यावेळी स्पष्ट दिसत आहे.
एमसी व अब्दूमधील काय आहे वाद…
एक अधिकृत निवेदन जारी करून अब्दूने स्टेनवर आपला फोन डिस्कनेक्ट केल्याचा आरोप केला. अब्दू त्याच्या गाण्याच्या प्रमोशनसाठी फोन करत असल्याचं तो मीडियात म्हणतोय, पण तसं नाहीये. त्याचबरोबर एका गाण्यावर काम करण्यासाठी दोघांमध्ये चर्चा झाल्याचेही सांगण्यात आले, मात्र स्टॅनने नकार दिला.
स्टॅनच्या कॉन्सर्टला पोहोचलेल्या अब्दूला स्टॅनच्या टीमने आत जाण्यापासून रोखले आणि छोटेभाईजानच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली, असेही सांगण्यात आले आहे.