अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : नागरिकांना सोशल डिस्टन्स, मास्क वापरण्याचे ‘ब्रह्मज्ञान’ सांगणाऱ्या महापालिकेतच नियमांची ऐशी-तैशी होत आहे.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या बैठकीत मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसले.
विशेष म्हणजे, यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनीही सोयीस्कर भूमिका बजावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरात कोरोना बाधित रुणांचे प्रमाण वाढत आहे. शासकीय कार्यालयासाठी नियमावली शासनाने जाहीर केलेली आहे.
सोशल डिस्टन्स पाळणे, मास्क बापरणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. राजकीय कार्यक्रम, बैठका न घेण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत.
असे असतांनाही महापालिकेत बुधवारी खासदार विखे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस सुमारे ५० हून अधिक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, ठेकेदार, अधिकारी उपस्थित होते.
शासनाने गर्दी टाळण्याचे केलेल्या आवाहनाला केराची टोपली दाखवत व सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवत ही बैठक घेण्यात आली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews