आरोग्य विभागात मेगा भरती…! तब्बल १० हजार ९४९ पदांसाठी आजपासून भरती प्रक्रिया

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mega recruitment : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली आरोग्य विभागाची मेगा भरती आजपासून सुरू होत आहे. जवळपास १० हजार ९४९ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून त्याची जाहिरात मंगळवारी (म्हणजे आजच ) प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. या भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील तरुणांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०२१ साली आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबली होती. आरोग्य विभागात कमी मनुष्यबळ असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येतो आहे.

अशातच महिनाभरापूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारला खडबडून जाग आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील रखडलेली भरती प्रक्रिया मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. भरती प्रक्रियेत ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध ६० प्रकारची पदे मिळून एकूण १० हजार ९४९ पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भातील जाहिरात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होईल, असे ते म्हणाले. या भरती प्रक्रियेमले राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ही पदे भरणार

क’ आणि ‘ड’ श्रेणीतील १०,९४९ जागांसाठी ही जाहिरात आहे. आरोग्य सेवकांच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे.

गट ‘क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर गट ‘ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक पदे रिक्त आहेत.