Weather Update : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. कमी पावसामुळे खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही.
विशेष म्हणजे कमी पावसाचा फटका रब्बी हंगामाला देखील बसला आहे. रब्बी हंगामातील पीक लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. विशेष म्हणजे रब्बी मधून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळेल याची देखील शाश्वती राहिलेली नाही. कारण की गेल्या चार महिन्यांच्या काळात राज्यात अवकाळी पावसाने त्राहीमाम माजवला आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीची हजेरी लागली. याचा परिणाम म्हणून रब्बी हंगामात नुकतीच पेरणी केलेली पिके थोपटली गेली. यातून पिकांनी कशी-बशी उभारी घेतली. काही ठिकाणी पिके पूर्णपणे वाया गेलीत मात्र जिथे अवकाळी पावसाच प्रमाण कमी होतं तेथील पिके बऱ्यापैकी वाचलीत.
मात्र गेल्यावर्षी अवकाळीतुन वाचलेली पिके यावर्षी सुरुवातीलाच अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडली. दरम्यान आता पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे मलभ गडद होऊ लागले आहे. हवामान खात्याने 9 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती.
यानुसार राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून काल अर्थातच 10 फेब्रुवारी 2024 ला राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली. विदर्भातील वर्धा येथे काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद देखील करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी बांधवांची चिंता वाढली आहे.
विशेष बाब अशी की, महाराष्ट्रातील हे पावसाळी वातावरण आगामी काही दिवस असंच कायम राहणार आहे. महाराष्ट्रात 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत अवकाळी पावसात चा अंदाज देण्यात आला आहे. दरम्यान आज अर्थातच 11 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने या संबंधित अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.