अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- म्हाडाचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी २ दिवसांपूर्वी पुण्यामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. हा पेपर फोडण्यासाठी आरोपींनी अनोखी शक्कल लढवली आहे.
यासाठी आरोपींनी एक कोडवर्ड तयार केल्याचे समोर आले आहे. म्हाडा पेपर फोडण्यासाठी (Paper Leak) आरोपींनी ‘घरातील वस्तू कधी मिळणार’ अशा शब्दात कोडवर्ड तयार केला होता.
याप्रकरणी पुण्यामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. घर म्हणजे म्हाडा आणि वस्तू म्हणजे पेपर असा कोडवर्ड तयार करण्यात आला होता.
पोलसांनी ज्या दिवशी कारवाई केली त्या दिवशी आरोपींच्या संपर्कात असणाऱ्या आणि त्यांना फोन करणाऱ्या सर्वांची चौकशी होणार आहे.
आरोपींच्या फोनवर रात्री उशिरापर्यंत फोन आल्याचे तपासात समोर आले आहे. हे फोन कोणाचे आहेत. येणाऱ्या फोनमध्ये कोण आरोपी आहे का?
याचा शोध लावण्यासाठी त्यांची चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. म्हाडा भरतीची परीक्षा रविवारी होणार होती. 565 जागांसाठी ही परीक्षा होणार होती.
मात्र पेपर फुटण्याची तक्रार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर आव्हाडांनी शनिवारी रात्री उशिरा ट्वीट करून ही भरती परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली.