पुणे :- आज एक वेगळा हॅशटॅग सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळालाय. हा हॅशटॅग आहे #मी_भाजपा_सोडतोय.काही लोकं खूप गंभीरतेने या हॅशटॅगचा वापर करतायत, तर अनेकजण फक्त भंकस करण्यासाठी याचा वापर करतायत.
महाराष्ट्रात लवकरच महाशिवआघाडीच्या माध्यमातून नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळणार आहे. अशात मोठ्या प्रमाणावर नेटकरी अशा पद्धतीचे हॅशटॅग वापरून व्यक्त होनता दिसतायत.वेगवेगळी भन्नाट कारणं देत नटकऱ्यांनी मी_भाजपा_सोडतोय असं म्हटलं आहे.
अनेकांनी अमृता फडणवीसांचं गाणं ऐकता आलं नाही म्हणून मी भाजप सोडतोय असं म्हटलं तर काहींनी कोथरूड मध्ये साडी वाटप झालं पण आम्हाला शर्ट मिळाले नाही म्हणून मी भाजपा सोडतोय असं म्हटलं आहे.
पहा गमतीशीर ट्वीट्स –