Milk Price : जिल्हा दूध संघाकडून गाय दुधाच्या खरेदी दरातील कपातीपाठोपाठ आता विक्री दरातही प्रतिलिटर २ रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही कपात सोमवार, १३ जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी (दि. २९) जिल्ह्यातील सहकारी दूध संघांच्या प्रतिनिधींची बैठक कोल्हापुरात पार पडली. या बैठकीत खासगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात कपात केली आहे.
प्रतिलिटर ३२ रुपयांप्रमाणे गाय दूध खरेदी केली जात आहे; परंतु सहकारी संघांनी कपात केली नव्हती. गुरुवारी झालेल्या सहकारी संघांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत गाय दूध खरेदीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
खासगी दूध संघांबरोबरच सहकारी दूध संघांनीही गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गाय दुधाच्या ३.५ फॅटला व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर २ रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर ३७ रुपयांवरून ३५ रुपये होणार आहे. ही कपात शनिवार, १ जुलैपासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान, गाय दूध विक्री दरातही गोकुळकडून प्रतिलिटर २ रुपये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये गाय दूध विक्री दर प्रतिलिटर ५० ऐवजी ४८ रुपये, तर पुणे व मुंबईमध्ये विक्री दर प्रतिलिटर ५६ वरून ५४ रुपये करण्यात आला आहे.
गाय दूध विक्री दर
कोल्हापूर प्र. लि. ५० रुपयांवरून ४८ रुपये पुणे-मुंबई प्र. लि. ५६ रुपयांवरून ५४ रुपये